हे गाव सर्व समाज घटकानी वसलेले एक सुंदर गाव आहे. गावामध्ये तीन जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकी महादेव, मारुती व हजरत पीर चाँद बुखारी साहेब दर्गा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून चाँद बुखारी दर्याची ख्याती आहे. सन 1834 साली पैंगबर वासी काशीम बंडु मुल्लाणी यांनी आपल्या स्वःतच्या शेतामध्ये लहानसा
दर्गा बांधला त्यांना त्यावेळी दर्गा बांधण्यासाठी गावातील लोकांचे सहकार्य मिळाले त्यानंतर त्यांचे पूत्र पैगंबर वासी सिलेमान कादर मुल्लाणी यांनी दर्याचे व्यवस्थापन पाहण्यास सुरुवात केली त्यांनी दर्यास जाण्यासाठी ओढ्यालगत पायऱ्या बांधून घेतल्या त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी निर्माण झाल्या.
वडील आजोबा यांच्या दर्यातील व्यवस्थापनाचा वारसा जपूण ठेवण्यासाठी मौजे वडगावातील प्रतिष्ठित नागरीक व आपल्या कुटुंबाच्या मदतीने दर्याचे नुतनीकरण करुन सुसज्ज अशा दर्याची निर्मिती केली आहे. या कामी त्यांना त्यांचे सुपूत्र माजी सरपंच याशीन अल्ली मुलाणी यांचे सहकार्य लाभले. कै. गौस हजारी,
कै. बाबुराव चौगले, कै. शंकर आकिवाटे, कै. राजाराम शेंडगे, कै. गणपती भोरे, काशिम पटेल, हसन बारगीर, नामदेव, लोंढे यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गनीतून प्रशस्त असा दर्गा उभारला. चाँद बुखारी उरुसास कर्नाटक राज्यातून तसेच गावातील माहेर वासीसह लाखो भाविक उरुसासाठी येतात.