माझे गाव - माझा अभिमान • एक पाऊल विकासाकडे • समृद्ध गाव, सक्षम भारत 🏡 गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय • शिक्षण • आरोग्य • स्वच्छता • पाणी • रोजगार • पायाभूत सुविधा 🏡

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविणार

- सरपंच कस्तुरी पाटील


पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहीत करण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. याम ध्ये ३१ डिसेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती सरपंच कस्तुरी पाटील यांनी दिली. मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या शाहू सभागृहात विशेष ग्राम

development-1

सभा पार पडली. यावेळी सुशासनयुक्त व लोकाभिमुक पंचायत प्रशासन, आर्थिकदृष्ट्या सक्षम पंचायत, जल समृध्द, स्वच्छ व हरितगाव, रोजगार हमी व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय

, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण, या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी भारती देंगे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तलाठी सचिन चांदणे यांनी पाणंद रस्त्यासंदर्भात माहिती दिली. तर कृषी सहाय्यक उमेश सकटे व डॉ. पंकज पाटील

यांनी आपआपल्या विभागाची सखोल माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले, ग्राम पंचायत अधिकारी भारती देंगे पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनिल खारेपाटणे, सुरेश कांबरे, रघुनाथ गोरड, नितीन घोरपडे, सुवर्णा सुतार, सुनिता मोरे, सविता सावंत, दिपाली तराळ, मधुमती चौगुले, माधूरी आकिवाटे, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे, महिला बचत गट, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मौजे वडगांव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण

development-2

शिरोली महान कार्य वृत्तसेवा पत्रे मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील ग्राम पंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोफत विमा उतरविण्यात आला. ग्लोबल पर्सनल गार्ड पॉलिसी (प्रॉडक्ट), बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या या पॉलिसीमध्ये ५ लाख रूपयांचे अपघाती विमा संरक्षण व अपंगत्व विमा संरक्षण, तर २ लाख रूपयांचा अपघाती हॉस्पिटलायझशेन खर्च, अशा सुविधा मिळणार आहेत. सदरच्या विमा पॉलिसीची पत्रे विविध

मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्निल चौगुले, ग्रामसेविका भारती ढेंगे-पाटील, माजी उपसरपंच सुनिल खारेपाटणे, सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, नितीन घोरपडे, सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ, मिनाक्षी आकिवाटे, मधुमती चौगुले, कर्मचारी ज्ञानेश्वर सावंत, मंगेश गोरड, आनंदा घुगरे, सुभाष कांबळे, स्वाती पट्टणकुडे व विमा प्रतिनिधी सतिश सावंत आदी उपस्थित होते.

• विशेष सहकार्य •
development-3...
developmetnt-5...
development-6...
development-4...

टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत वर्ष 2024-25

साठी ग्रामपंचायत मौजे वडगाव यांना ताम्रपदक स्वरुपात प्रशस्तीपत्र व महात्मा गांधीजी यांची मूर्ती प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर

सर्वांचे मनापासून आभार...!